You are currently viewing शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात “नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान” अंतर्गत नेत्र तपासणी शिबिर

शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात “नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान” अंतर्गत नेत्र तपासणी शिबिर

वेंगुर्ला :

भारतीय जनता पार्टी शिरोडा-आरवली आयोजित “सेवा पंधरवडा” निमित्त शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे आज सोमवार, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत “नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान” अंतर्गत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन वेंगुर्ला मंडल उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे यांनी दीपप्रज्वलन करून केले. या वेळी डॉ. अक्षय नाईक, डॉ. प्रशांत जाड, डॉ. अक्षय विरगाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख मयूरेश शिरोडकर यांनी केले.

या वेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टरांचे स्वागत केले. मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमातून नेत्ररोगाशी संबंधित लाखो गरजूंना दिलासा मिळणार आहे. शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, औषधोपचार व मोफत चष्मेवाटपाची सुविधा करण्यात आली आहे.

शिबिराला शिरोडा शहर अध्यक्ष अमित गावडे, तालुका चिटणीस श्रीकृष्ण धानजी, तालुका कार्यकारिणी सदस्य संतोष अणसूरकर, युवा मोर्चा सरचिटणीस राहुल गावडे, शिरोडा बूथ अध्यक्ष अनुक्रमे अभय बर्डे, सोमाकांत सावंत, चंद्रशेखर गोडकर, प्रसाद परब, माजी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य सौ.हेतल गावडे, जयमाला गावडे, शिरोडा माजी सरपंच विजय पडवळ, भाजप शिरोडा शहर पदाधिकारी दत्ताराम फटजी, विदयाधर धानजी, दादा शेटये, अशोक परब, प्राजेश गावडे, शिरोडा महिला पदाधिकारी सौ.समृद्धी धानजी, सौ.स्नेहा गोडकर, आरवली सरपंच तथा आरवली बूथ अध्यक्ष समीर कांबळी, आरवली शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक, आरवली बूथ अध्यक्ष मिलिंद साळगांवकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी सनातन संस्थेच्या सौ. अनुश्री गावस्कर, सौ. अदिती भेरे, सौ. विना माईणकर, विरेध माईणकर यांनी “प्रथोपचार” विषयी मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा