*वैश्य समाज पतसंस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न-
*जिल्ह्याबाहेर शाखा विस्ताराची घोषणा*
फोंडाघाट
राधाकृष्ण मंगल कार्यालयात वैश्य समाज पतसंस्थेची सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली. चेअरमन श्री. बाळासाहेब वळंजु आणि संस्थेचे सी.ई.ओ. प्रसाद पावस्कर यांनी सर्व सभासदांना विश्वासात घेऊन सभेचे सुत्रसंचलन केले. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने सभासदांनी उपस्थिती दर्शवली.
सी.ई.ओ. प्रसाद पावस्कर यांनी आर्थिक वर्षाचा अहवाल सादर करताना उपस्थित सभासदांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत चर्चा पार पाडली. सभेला संपूर्ण संचालक मंडळाची उपस्थिती होती, ज्यामुळे सभेला अधिक औपचारिकता व गांभीर्य लाभले.
ही पतसंस्था सध्या जिल्ह्यातील एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपाला आली असून, लवकरच जिल्ह्याबाहेरही शाखा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. या संस्थेला उज्वल यश मिळावे, अशी भावना व शुभेच्छा सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केल्या.
— अजित नाडकर्णी, संवाद मिडिया

