You are currently viewing ‘स्वरचित काव्य वाचन’ स्पर्धेस प्रारंभ 

‘स्वरचित काव्य वाचन’ स्पर्धेस प्रारंभ 

सावंतवाडी :

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी यांच्या वतीने सावंतवाडी तालुका मर्यादित विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘स्वरचित काव्य वाचन स्पर्धा’ चा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. कोकणातील साहित्याचा वारसा कायम टिकवून ठेवण्यासाठी आणि मुलांमध्ये लेखन-वाचनाची आवड वाढवण्यासाठी कोमसाप या स्पर्धेचं केलेलं आयोजन स्तुत्य स्वरुपाचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी यांनी व्यक्त केले.

स्पर्धेचा शुभारंभ ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, प्रा. सुभाष गोवेकर आणि देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. याप्रसंगी कोमसापचे जिल्हा सदस्य भरत गावडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक पटेकर, जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, ॲड. नकुल पार्सेकर, प्रा. रूपेश पाटील, सहसचिव विनायक गांवस, मंगल नाईक-जोशी, किशोर वालावलकर, प्रज्ञा मातोंडकर, आत्माराम धुरी, साबाजी परब आदींसह स्पर्धक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

हा कार्यक्रम कोकणच्या नव्या पिढीतील साहित्यिकांना प्रोत्साहन देणारा आणि साहित्यिक वातावरणाची निर्मिती करणारा ठरेल असा विश्वास प्रा. सुभाष गोवेकर यांनी व्यक्त केले. प्राचार्य यशोधन गवस यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक कवी दीपक पटेकर यांनी केले. सूत्रसंचालन विनायक गांवस यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा