You are currently viewing देवगड पंचायत समिती उपसभापतीपदी रविंद्र तिर्लाेटकर बिनविरोध…

देवगड पंचायत समिती उपसभापतीपदी रविंद्र तिर्लाेटकर बिनविरोध…

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

देवगड

देवगड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी रविंद्र तिर्लाेटकर यांची पक्ष धाेरणानुसार निवड झाली आहे. देवगड पंचायत समिती उपसभापतीपदाची निवडणुक प्रक्रिया पीठासन अधिकारी तथा तहसिलदार मारूती कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्या उपस्थितीत पार पडली. या पदासाठी रविंद्र तिर्लाेटकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला हाेता. यामुळे त्यांची उपसभापतीपदासाठी बिनविराेध निवड झाली. रिंवद्र तिर्लाेटकर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचे जाहीर करताना भाजपा कार्यकर्त्यांनी ढाेलताशांच्या गजरात जल्लाेष केला. सभापती लक्ष्मण उ\र् रवि पाळेकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, तालुकाध्यक्ष संताेष किंजवडेकर,माजी सभापती सुनिल पारकर, पं.स.सदस्य सदाशिव ओगले, अजित कांबळे, निकीता कदम, जयश्री आडीवरेकर, पुर्वा तावडे, शुभा कदम, अपुर्वा तावडे, प्राजक्ता घाडी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, पं.स.अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा