प्लेसमेंट ड्राईव्हचे 30 सप्टेंबररोजी आयोजन
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत एस.पी.के. महाविद्यालय, सावंतवाडी येथे होणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे यांनी दिली आहे.
या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये KOLBRO Group Pvt. Ltd. या नामांकित कंपनीत गोवा येथे असलेल्या ५० रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. उपलब्ध पदांमध्ये सर्व्हेअर (Surveyor) आणि टीम इंचार्ज (Team Incharge) या पदांचा समावेश आहे. भरतीसाठी पात्रता – आय.टी.आय., डिप्लोमा (सिव्हिल) किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर (Any Graduate) अशी आहे.
इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रांसह नियोजित दिवशी ठरलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्याकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ई-मेल sindhudurgrojgar@gmail.com किंवा दूरध्वनी क्रमांक 02362-228835 वर संपर्क साधावा.

