You are currently viewing आजचे चिंतन

आजचे चिंतन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच प्रमुख लेखक कवी पांडुरंग वसंत कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*आजचे चिंतन*

 

*कुठलीही गोष्ट आपण म्हणजे आपले मन वा बुद्धी कश्या प्रकारे घेते म्हणजे स्वीकारते, यावर त्या गोष्टीची प्रत ठरते. इतरांच्या दृष्टीने खराब असणारी गोष्ट आपल्या दृष्टीने चांगली असू शकते. गोष्ट तीच. पण दोन व्यक्तीपैकी एकाला ती चांगली वाटते तर दुसऱ्याला ती वाईट वाटते. हे असे का बरे होते ? यांचे अगदी समर्पक उत्तर म्हणजे आपण ती गोष्ट ज्या प्रकारे घेतो, तशी ती आपल्यासाठी असतें, होते. म्हणून दुसऱ्याला कधीच नावे ठेवू नयेत कारण तुम्हाला न आवडलेली गोष्ट त्यांना आवडलेली असतें कारण ती त्याने सकारात्मक पद्धतीने घेतलेली असेल. म्हणून अश्या वेळी खबरदारीने विचारपूर्वक वागायला हवे.उगीच आहे तोंडात जीभ म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला असे होता कामा नये. जिभ सुद्धा परमेश्वराने आपल्याला चांगले बोलण्यासाठी दिलेले साधन आहे. त्याचाही विचार करून आपण बोलले पाहिजे. साधनांचा योग्य वापर म्हणजे साधना. या साधनेच्या आधारे आपण भगवंतालाही प्राप्त करू शकतो. नंतर ही साधनाही गळून पडते आणि आपण भगवंतात विलीन होतो. साधनाही परत साधन होते. साध्यापर्यंत पोहोचविणे हेच साधनाचे काम असतें. साधन ते योग्य प्रकारे करते. यावरून बऱ्याच गोष्टी आपण शिकू शकतो पण आधी शिकलेची पाहिजे आणि ते प्रत्यक्ष कृतीत उतरले पाहिजे.*

*इति साठाउत्तरांची कहाणी पाचाउत्तरी सुफळ संपूर्ण.*

*हरये नमः हरये नमः हरये नमः lll*

 

*……… पांडुरंग कुलकर्णी नाशिक/ मुंबई………*

प्रतिक्रिया व्यक्त करा