You are currently viewing सामाजिक व शैक्षणिक विषयांवर जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्याशी सविस्तर चर्चा

सामाजिक व शैक्षणिक विषयांवर जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्याशी सविस्तर चर्चा

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांची सदिच्छा भेट

 

बांदा :

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष तसेच समाजकार्यातून सातत्याने आपली स्वतंत्र छाप उमटवणारे दयानंद कुबल यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि युवकांशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात शिक्षणाच्या दर्जात सुधारणा, युवकांना रोजगार व प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच सामाजिक कार्यातून सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी संस्थात्मक स्तरावर उपक्रम राबविण्याचे मुद्दे या चर्चेत अग्रस्थानी होते.

यावेळी संस्थेचे सहकारी प्रथमेश सावंत आणि गौरी आडेलकर उपस्थित होते. जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी या सर्व सूचनांचा गांभीर्याने विचार करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या भेटीमुळे सामाजिक, शैक्षणिक व युवकवर्गासाठी अनेक सकारात्मक उपक्रम राबविण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा