कणकवली
नॅशनल हायवेवर वागदे टेंबवाडी येथे धावत्या अल्टो कारचा टायर फुटून कार रस्ता सोडून सुमारे १० फूट खोल खड्ड्यात कोसळली.या अपघातात कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. मालवण तालुक्यातील वायरी येथील मंदार गाड जे आपल्या ताब्यातील अल्टो कार घेऊन पत्नी, मुलगी व अन्य दोन नातेवाईकांसह मालवणहून कोल्हापूरच्या दिशेने जात होते. वागदे टेंबवाडी येथील स्वीट चिली हॉटेलनजीक धावत्या अल्टो कारचा टायर फुटून कार रस्ता सोडून रस्त्यालगत खड्ड्यात कोसळली. आज दुपारी ३ : ४० वा.च्या सुमारास हा अपघात घडला.
या अपघातात सुदैवाने कोणी गंभीर जखमी झाले नसले तरी किरकोळ दुखापत झाली आहे. कारचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या कामानिमित्त कणकवलीत जात असलेले सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी तात्काळ अपघातस्थळी जात स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना कारमधून बाहेर काढले. जखमींना कणकवलीत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी मिलिंद पाटील यांच्यासह वागदे टेंबवाडी तील स्थानिक ग्रामस्थ प्रदीप गावडे, बाळा गावडे, महेश गावडे, विनायक गावडे यांनी अपघातग्रस्तांना मदत केली.