*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा मानसी मोहन जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*देवी स्तुती*
मुखकमल विलसते तेजःपुंज
मळवट लाल भरला भाळी
नवग्रहाची नथ शोभून दिसते
नयन हासले तुझे स़ोनसळी
हिरवा शालू जरी बुट्यांचा
रत्नहार रुळतो छातीवरी
पोत मण्यांची काळी काळी
रत्नजडित गं मुकुट डोईवरी
प्रसन्न मुद्रा शितल नजर
भक्तांवर मायेची पाखर
सुदबुध,शक्ती दे कुष्मांडा
जीभेवरी तू घोळवते साखर
कुष्मांडा तू ,तुच भवानी
शितलतेची मूर्त भासते
मनोमनी ती प्रसन्नतेने
कृपा प्रसाद नि भक्ती वाटते
प्रा.मानसी मोहन जोशी
