कल्पना बांदेकर यांच्या काव्यसंग्रहाला ‘साहित्यवलय पुरस्कार २०२५’ जाहीर
सावंतवाडी
साहित्य क्षेत्रातल्या उत्तुंग योगदानाची दखल घेत लेखिका कल्पना बांदेकर यांच्या “जपलाला कनवटीचा” या काव्यसंग्रहाला प्रतिष्ठेचा ‘साहित्यवलय पुरस्कार २०२५’ जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या १० ऑक्टोबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडणार आहे. यावेळी साहित्य आणि संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर असतील.
मनसे नेते आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणारा हा सोहळा साहित्यप्रेमींना एक विशेष सांस्कृतिक अनुभव देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
