दोडामार्ग येथे युवकांची गळफास घेऊन आत्महत्या!
दोडामार्ग:
दोडामार्ग येथील २३ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली आहे. पवन प्रशांत नाईक असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन नाईक या २३ वर्षीय तरुणाने बुधवारी रात्रीच्या सुमारास राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेमुळे नाईक कुटुंब आणि दोडामार्ग परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पवन नाईक या तरुणाने आत्महत्या का केली, याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध सुरू आहे.
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन घटनेनंतर पवन नाईक यांचा मृतदेह दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला, व शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेबद्दल अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत आहेत.
