You are currently viewing न्हावेलीत आकाश कंदील आणि नरकासुर स्पर्धांचे आयोजन…

न्हावेलीत आकाश कंदील आणि नरकासुर स्पर्धांचे आयोजन…

न्हावेलीत आकाश कंदील आणि नरकासुर स्पर्धांचे आयोजन…

सावंतवाडी

येथील शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख आणि न्हावेलीचे उपसरपंच अक्षय पार्सेकर आणि युवा गृप न्हावेली यांच्या पुढाकाराने दिवाळी सणाच्या निमित्ताने न्हावेली येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये ग्रामस्तरीय आकाश कंदील स्पर्धा आणि सावंतवाडी तालुकास्तरीय नरकासुर स्पर्धेचा समावेश आहे. या दोन्ही स्पर्धा १९ ऑक्टोबरला संध्याकाळी ६ वाजता ईस्वटी मंदिर, न्हावेली – पार्सेकरवाडी येथे होणार आहेत.​ स्पर्धेतील विजेत्यांसाठी रोख रकमेची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यात

​आकाश कंदील स्पर्धा प्रथम पारितोषिक: २,०००​ द्वितीय पारितोषिक १,५००​, तृतीय पारितोषिक १,०००, तर ​नरकासुर स्पर्धेसाठी ​प्रथम पारितोषिक ३,०००, द्वितीय पारितोषिक २,००० तृतीय पारितोषिक.१,००० या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी काही महत्त्वाचे नियम ठरवण्यात आले आहेत. ​आकाश कंदील स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी स्वतः तयार केलेला कंदील आणणे बंधनकारक आहे. ​नरकासुर स्पर्धा केवळ सावंतवाडी तालुक्यातील स्पर्धकांसाठीच खुली आहे. ​सर्व स्पर्धकांसाठी परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. ​आयोजकांनी न्हावेली आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवाळीचा उत्साह वाढवण्याचे आवाहन केले आहे. ​अधिक माहितीसाठी संपर्क ​अक्षय पार्सेकर: ९४२२९४०३४८, ​समीर पार्सेकर ९९२११०९४९३, ​राज धवन ८३६९००६७८४, ​ओम पार्सेकर ७५०७३०२१५८ यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा