You are currently viewing निसर्गाचं वेड

निसर्गाचं वेड

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*निसर्गाचं वेड*

 

प्राचीच्या मंद, शांतलहरी

कुठुनसे कवडसे चंदेरी

अंधारछाया डोंगरावरी

चमकत्या छटा सागरावरी.

 

स्तब्धता जीवा वेड लावी

सार्या स्मृतींच्या उरी ठेवी

कधी निरामय एकांत हा

सजणाची हृदयी साद यावी.

 

गेले हरवून ते क्षण सारे

हृदयी फुटती भावनांचे

धुमसते,न आवरते धुमारे

मनी काहूरदाटे अशांत वारे.

 

मिटवून हृदयाच्या बंद गाभारी

आठवणींच्या मौक्तिक सरी

हसूनस्वागता उर्वरित वाटेवरी

साठवितेनेत्रीअथांग स्वर्णलहरी.

🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

प्रतिक्रिया व्यक्त करा