You are currently viewing वीण नात्यांची ..सैलावली..!!

वीण नात्यांची ..सैलावली..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वीण नात्यांची ..सैलावली..!!*

 

जिवंत जिव्हाळ्याची झुळझुळ

नात्यांतून काळजात शिरते

कंठातून फुटणारे रडू

नात्यांच्या वियोगात वाहते..

 

अंगातोंडाशी आलेलं माणूसपण

नात… मिरवत जात

ह्दयांत वेदनेची गाठ

मनाशीच बाळगून राहत…

 

नात्यांतील वीण सैलावली

नात …टोकदार होत

हिंदोळ्यावर झुलणारी नाती

सुखासुखी ..आकांत देत..

 

नातही ..वेळ पाहून

मागच्यामागे पळून जात

मनाला.. झळ सोसून

निपचित सोसावं लागत..

 

नाराज होण्याचा जमाना

कधीच ..निघून गेला

नात्याचं ढोंग करत

सोंगाचा जमाना आला..

 

जाणिवांचा खेळ नात्यांचा

अजाणतेने खेळावा लागतो

चैतन्याचा ..आधार घेत

नातेविश्वांत ..दंग होतो….!!

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा