सावंवाडी
सालईवाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलचे अध्यक्षपदी विजय न्हानू कदम यांची पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय-धोरणे सर्व सामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षनेतृत्वाने नेमणूक केलेली आहे. त्याचे नियुक्तीपत्र देताना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माननीय सुरेश राव गवत, प्रांतिक सदस्य माननीय उदयराव भोसले, महिला अध्यक्ष सौ .रेवती राणे, सावंतवाडी शहराध्यक्ष सत्यजित धारणकर, देशमुख संदीप राणे सेलचे तालुकाध्यक्ष , भाई सावंत (कलंबिस्त) तुषार भोसले, रवी राऊळ तालुका सदस्य आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.