You are currently viewing आनंदव्हाळ उतारावर मासे वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात;

आनंदव्हाळ उतारावर मासे वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात;

आनंदव्हाळ उतारावर मासे वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात;

विक्रेत्या महिला किरकोळ जखमी, टेम्पोचे नुकसान

मालवण

मालवणहून कणकवलीकडे मासे विक्रीसाठी निघालेल्या टेम्पोचा मंगळवारी सकाळी आनंदव्हाळ उतारावर अपघात झाला. या दुर्घटनेत टेम्पोतील मच्छी विक्रेत्या महिला किरकोळ जखमी झाल्या असून, टेम्पोच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊच्या सुमारास टेम्पो चालक गणेश तांडेल हे मच्छी विक्रेत्या महिलांना घेऊन निघाले होते. मात्र, आनंदव्हाळ उतारावर समोरून एका ओव्हरटेक करत येणाऱ्या कारला चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांनी ब्रेक मारल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडी भिंतीवर आदळले. या वेळी टेम्पो दरीत कोसळण्याचा संभव असतानाही झाडाला धडक बसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

जखमी महिलांना तातडीने चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मोठ्या संख्येने मच्छीमार बांधव घटनास्थळी पोहोचले. मालवण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून, पोलीस कर्मचारी जितेंद्र पेडणेकर, श्री. परब, अजय येरम अधिक तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा