नवीन कुर्ली येथे ग्रामविकास मंडळाकडून मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
फोंडाघाट
नवीन कुर्ली प्राथमिक शाळा येथे नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळामार्फत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये नवीन कुर्ली प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवी तसेच आठवी ते दहावी मध्ये जे गावातील विद्यार्थी इतर शाळेत शिकत आहेत त्यांना सुध्दा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या मध्ये विद्यार्थ्यांना विषयानुसार चित्रकला, आलेख तसेच प्रोजेक्ट साठी वह्या आणि सर्व मुलांना सॅंडल ,शूज चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक जोशी मॅडम यांनी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे आभार व्यक्त केले.
या प्रसंगी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप कामतेकर, नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष अरुणोदय पिळणकर, कृष्णा परब, प्रशांत दळवी, सखाराम हुंबे, शिवाजी चव्हाण ,आशिष पेडणेकर तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व शिक्षण प्रेमी उपस्थित होते.

