एम्पायर ग्रुपचे संतोष चव्हाण यांची मातेच्या चरणी मनोभावे पूजा अर्चा
कणकवली :
भारतीय जनता पार्टी, कणकवली तालुक्यातर्फे आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२५ ला आज उत्साहपूर्ण सुरुवात झाली. सकाळी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून धार्मिक विधी, पूजन आणि महाआरतीने या उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी एम्पायर ग्रुपचे संतोष चव्हाण यांनीही मनोभावे मातेच्या चरणी पूजा करून आशीर्वाद घेतला.
या प्रसंगी भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आकर्षक देवी मंडप, सुंदर सजावट व धार्मिक वातावरणामुळे भाविकांच्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण झाला. देवीसमोर विविध नैवेद्य अर्पण करून आरती करण्यात आली.
नवरात्रोत्सवानिमित्त पुढील नऊ दिवस दररोज धार्मिक कार्यक्रम, देवीपूजन, भजन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कणकवली तालुक्यातील हा नवरात्रोत्सव भाविकांसाठी श्रद्धा व भक्तीचा सोहळा ठरणार आहे.

