*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आरोपपत्र पावसावर….!!*
चकाकणा-या वीजेला घेऊन पळाला
त्याला जबाबदार धरायला हवं
विनयभंग त्या पावसाने केला
आरोपपत्र त्याच्यावर दाखलं करायला हवं….
बेभरवशी कोसळतो !तोंडदेखला होतो
धूम पळाले !फसवून काळे मेघ
फुगून बसली त्याची लाडकी माती
तळहातावर उमटली कोरडी रेघ
पाऊस झाला हद्दपार परागंदा
अवकाळीच्या मांडीवर वाजे घुंगुरखळे
अमंगल जगणं कोरडं झालं
गर्भार मातीनं कालवले शुष्क गळे
करकर वाजल्या दुष्काळी बिजाग-या
कोयंडा गाऊ लागला गाणी रडकी
ओठ थिजले!ओढ लागली!डोळे भिजले
पिकांनी जीव टाकला झाली सडकी
पावसावर गुन्हेगार ठरवायलाचं हवं
त्याच्यावर आरोपपत्र दाखल करायलाच हवं……
खुनाचा प्रत्यक्षदर्शी पुरावाचं समोर
त्यालाच फासावर चढवायलाचं हवं
आत्महत्येस जबाबदार ठरवायलाचं हवं
बाबा ठाकूर

