*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रा डॉ जी आर उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम आरती*
*आरती अंबेची*
जय जय जगदंबे
शिवांबे
तारशी विश्व कुटुंबे
ll ध्रु ll
नवं दिन नवराती आश्विनी
पूजा दैनंदिनी
नवं घट स्थापूनी
नवं धान्यी
माळूनी पुष्प सुरंगे
ll 1 ll
नवं रात जागुनी
गजर हो त्रिगुणी
नवं विध भक्तीची
बांधू फुल वेणी
करूया जागर
भक्तीचीचं वाणी
जोडूनि कर अंबे
ll 2 ll
नवं विध आन्नाने
रस भरीत पक्वान्ने
घेई अन्न पूर्णे
हेच आमचे मागणे
घालुनी साष्टांगे
तारशी तूच कदंबे
ll 3 ll
त्रिशूल खडगं
शस्त्राचा भडीमार
करशी संहार
असंख्य ते आसूर
लोळविले तू पार
जननी जगदंबे
ll 4 ll
प्रा डॉ जी आर प्रविण जोशी
कॉपी राईट
कर्नाटक 591213
