You are currently viewing प्रश्नचिन्ह शाळेमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र

प्रश्नचिन्ह शाळेमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र

अमरावती दि.22

संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये परिचित असलेल्या अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फासेपारधी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या श्री मतीन भोसले यांच्या प्रश्नचिन्ह या शाळेमध्ये लवकरच स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी श्री मतीन भोसले यांच्या निमंत्रणावरुन मिशन IAS चे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे. सहसंचालक प्रा.प्रवीण खांडवे व पत्रकार श्री सुनील इंदु वामन ठाकरे यांनी आज भेट दिली .फासेपारधी समाजातले बरेचसे विद्यार्थी स्पर्धापरीक्षेची तयारी करीत असून त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे ते योग्य दिशेने मार्गक्रमण करीत नाहीत .त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते नोकरीला लागावे यासाठी श्री मतीन भोसले हे कार्यरत आहेत. यासंदर्भात त्यांनी अमरावतीचे कर्तव्यदक्ष अधिकारी जिल्हाधिकारीयांची भेट घेऊन सविस्तर माहिती सांगितली .मा.जिल्हाधिकारी यांनी त्यासंदर्भात एक प्रस्ताव तयार करण्यासाठी करण्याची सूचना श्री भोसले यांना केली .त्यासाठी श्री मतीन भोसले यांनी प्रा. काठोळे व प्रा. खांडवे यांना निमंत्रित केले होते. त्यांनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या जागेची पाहणी करून स्पर्धा परीक्षा केंद्राच्या उभारणीसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे कबूल केले.याप्रसंगी प्रश्नचिन्ह शाळेच्या इमारतीचे डिझाईनिंग तसेच नियोजित भोजन कक्ष तसेच स्टाफ कर्मचारी निवासस्थाने यासंदर्भात देखील त्यांनी पाहणी केली असून मिशन आयएस या कामासाठी संपूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन संस्थेच्या वतीने देण्यात आले .विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून जर स्पर्धा परीक्षेचे बाळकडू मिळाले तर ते आपल्या जीवनामध्ये निश्चित यशस्वी होऊ शकतात .यादृष्टीने प्रा. नरेशचंद्र काठोळे यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित शिक्षकांना मिशन आयएएस समजावून सांगितले. प्रा.प्रवीण खांडवे हे स्व. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विभाग प्रमुख असून त्यांनी शाळेचे नकाशे वसतिगृहाचे नकाशे तसेच तसेच नियोजित स्पर्धा परीक्षा केंद्राचे नकाशे तयार करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्या ठिकाणी एक चांगले स्पर्धा परीक्षा केंद्र तयार व्हावे यादृष्टीने सर्व मदत करण्याची तयारी मिशन आयएस परिवाराने दर्शविली. यावेळेस स्पर्धा परीक्षेचे तयारी करणारे श्री योगेश मंजू पवार .विक्रम बाई भोसले .शिवानंद मंजू पवार व अपंग विद्यार्थी चेतन राजेंद्र पापळकर या मुलांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके तसेच सुपर सिटी हा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी मिशन आयएसने तयारी दर्शविली .या भेटीप्रसंगी सर्वश्री श्री मतीन भोसले. सीमा भोसले. सिद्धांत पाईकराव .सुनिता भीमराव पाटील. प्रशांत गोरमन .ओमकार पवार. नमिता भोसले .सुरेखा लोंढे .प्रगती भोसले .अल्केश शेळके हे उपस्थित होते आजच्या या भेटीबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले असून परिसरातील सर्व विद्यार्थी वर्गाची सोय होणार आहे.

 

प्रा.नरेशचन्द्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा