You are currently viewing वन्यजीव संवर्धन प्रशिक्षण शिबिरासाठी ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड…

वन्यजीव संवर्धन प्रशिक्षण शिबिरासाठी ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड…

वन्यजीव संवर्धन प्रशिक्षण शिबिरासाठी ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड…

​मालवण

डेहराडून-उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील वन व वन्यजीव संवर्धन प्रशिक्षण शिबिरासाठी मालवण येथील ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड झाली आहे. ​वन आणि वन्यजीव संवर्धनात नागरिक आणि विज्ञानाची भूमिका हा या प्रशिक्षणाचा मुख्य विषय आहे. या महत्त्वपूर्ण शिबिरासाठी देशभरातून केवळ ३० प्रतिनिधींची निवड करण्यात आली असून त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मांजरेकर यांचा समावेश आहे.

​या शिबिरात वनसंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, नागरिकांचा सहभाग आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने पर्यावरण संरक्षण या विषयांवर सखोल प्रशिक्षण आणि चर्चा होणार आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ॲड. मांजरेकर यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा