काय ही अवस्था एसटी महामंडळाची ?
सावंतवाडी
सावंतवाडी खालचे वेंगुला बस स्टॅन्ड जवळील ही वस्तुस्थिती आहे गुरं देखील त्या बस स्थानकावर बसणार नाही अशी अवस्था सावंतवाडीच्या खालच्या बस स्टँडची झालेली आहे तर बस स्टॅन्डच्या आत जाणाऱ्या रस्त्यावरच भला मोठा खड्डा पडला आहे आत्ताच घटना एसटीच्या मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांला खड्ड्यात मागच चाक गेल्यामुळे जोरदार हादरा बसला व त्या प्रवासाच्या तोंडातून “आई ग.. ” असा मोठा आवाज ऐकू आला कदाचित त्याच्या कमरेला नक्कीच इजा झाली असेल जर अशावेळी मागच्या सीटवर एखादा ज्येष्ठ नागरिक बसला असेल तर त्यांची काय अवस्था होईल या बस स्थानकावरून असंख्य शालेय विद्यार्थी, नागरिक -ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात आपण प्रवाशांना सेवा देतात कि प्रवाशांना जखमी करतात हे योग्य नाही आणि आता हे खपवून देखील घेतलं जाणार नाही जर दोन दिवसात हा खड्डा बुजवला गेला नाही तर त्याचं खड्ड्यात बसून आंदोलन करणार असा इशारा रवी जाधव यांनी दिला आहे.
