You are currently viewing भाजप प्रदेशाध्यक्ष आम.रवींद्र चव्हाण वाढदिवस अभिष्टचिंतन

भाजप प्रदेशाध्यक्ष आम.रवींद्र चव्हाण वाढदिवस अभिष्टचिंतन

*भाजप प्रदेशाध्यक्ष आम.रवींद्र चव्हाण वाढदिवस अभिष्टचिंतन*

महाराष्ट्र विधानसभेतील डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आम.रवींद्र चव्हाण यांचा २० सप्टेंबर हा जन्मदिवस. महाराष्ट्राच्या राजकारणात शांत संयमी परंतु अत्यंत प्रभावी राजकीय व्यक्तिमत्व म्हणून आम.रवींद्र चव्हाण ओळखले जातात. त्यांनी २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीत डोंबिवली मतदारसंघातून सलग चारवेळा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षात त्यांचे वजन आहे. त्यामुळेच आम.रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.
महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर, चव्हाण यांनी आमदार म्हणून उत्तम कार्य सुरू ठेवले होते, त्यांच्या प्रभावी कार्यामुळे जुलै २०२० मध्ये महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यान २०२२ ते २०२४ या काळात ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र शासनात कॅबिनेट मंत्री होते. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळता) आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांची जबाबदारी सांभाळली होती. तसेच त्यांनी पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणूनही उत्तम कार्य केले. यापूर्वी, २०१६ ते २०१९ या कालावधीत त्यांनी बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांचे राज्यमंत्री पद भूषवले होते. ११ जानेवारी २०२५ रोजी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
कोकणात मूळ गाव असलेले आम.रवींद्र चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी देऊन कोकणात पाठविण्यात आल्यानंतर आणि राणेंचा सिंधुदुर्गातील प्रभाव कमी झालेला त्यावेळी मुंबईतून आलेल्या चव्हाण यांनी सिंधुदुर्गात भाजपाचे मजबूत संघटन निर्माण केले आणि त्यांच्या जादुमय संघटन कौशल्यामुळे जिल्ह्यातील अनेक निवडणुकांमध्ये करिष्मा करून दाखवत सावंतवाडी नगरपालिकेसह इतर अनेक ग्रामपंचायती, जिल्हा बँक आदी ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आणून आपले राजकीय कौशल्य सिंधुदुर्गवासीयांना दाखवून दिले होते. आजही सन्मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणी करण्यात आपला पहिला नंबर असेल असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नक्कीच आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला चांगले दिवस येतील असे म्हणायला काहीच हरकत नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा