You are currently viewing शिधापत्रिका धारकांनी ३० सप्टेंबरपर्यत ई -केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

शिधापत्रिका धारकांनी ३० सप्टेंबरपर्यत ई -केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

शिधापत्रिका धारकांनी ३० सप्टेंबरपर्यत ई -केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 

राष्ट्रीय अन्न सुरक्षायोजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांचे ई- केवायसी प्रमाणिकरण  व  आयुष्यमान भारत योजनेंतर्गत शिधापत्रिका ऑनलाइन करण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले

 राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रमाणिकरण प्रक्रिया १०० टक्के पुर्ण करण्यासाठी सर्व तहसिलदार यांना आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यमंत्री, गृह (शहरे), महसुल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, अन्न व औषध प्रशासन यांनी आढावा बैठकीमध्ये ई-केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांचा धान्याचा लाभ बंद होणार असल्याने सर्व पात्र लाभार्थ्यांची १०० टक्के ई-केवायसी प्रक्रीया पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तरी सर्व लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण करण्याकरीता संबंधित रास्तभाव धान्य दुकानदार यांचेशी संपर्क साधुन ई-पॉस मशिनवर थंब लावुन ई केवायसी प्रक्रीया पूर्ण करण्याची आहे. तसेच ई-केवायसी नाकारण्यात आली असल्यास आपले आधार कार्ड संबंधित तहसिलदार कार्यालयात जाऊन RCMS मधील माहिती सुधारीत करण्याची आहे.

“दुकानात जाता नाही आले तर घरी ई-केवायसी करा” राज्यात शिधापत्रिकाधारक यांना ई-केवायसी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘मेरा ई-केवायसी अॅप’ सुरु केले आहे या अॅपवरून शिधापत्रिकाधारकांना आता घरबसल्या ई-केवायसी करता येणार आहे.

“आयुष्यमान भारत कार्ड योजना” याकरिता सर्व शिधापत्रिकाधारक पात्र असल्याने त्याअनुषंगाने सर्व शिधापत्रिका ऑनलाईन करण्याकरीता लाभार्थी यांनी संबंधित तहसिलदार कार्यालय व CSC सेंटर मध्ये संपर्क साधुन शिधापत्रिका ऑनलाईन करावी. सर्व पात्र लाभार्थ्यांची १०० टक्के ई-केवायसी प्रक्रीया दिनांक ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पुर्ण करण्याचे व आयुष्यमान भारत कार्ड योजनेंतर्गत सर्व शिधापत्रिका ऑनलाईन करण्याकरिता सर्व लाभार्थ्यांना व रास्तभाव धान्य दुकानदारांना आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा