पाण्याची पातळी वाढल्याने तपोवनमध्ये वीज प्रकल्प वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे. प्रशासन घटनास्थळी पोहोचलं असून मदत व बचावकार्य सुरू झालं आहे.
उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, रैनी वीज प्रकल्प पूर्णपणे वाहून गेला आहे आणि तपोवनचेही नुकसान झाले. पहिल्या प्रकल्पातून 32 लोक बेपत्ता आहेत तर दुसऱ्या प्रकल्पातून 121 लोक बेपत्ता आहेत. यापैकी 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले
आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, 170 जण बेपत्ता असल्याची माहिती, बचावकार्य सुरुच
उत्तराखंडमधील विध्वंसानंतर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. काही लोक अजूनही बोगद्यात अडकले आहेत. बोगदा खोदण्यासाठी एक्सावेटर आणि पोकलँड मशीन घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. रात्री देखील बचाव कार्य चालू राहण्यासाठी लाईट बसविण्यात आली आहे.
उत्तराखंडमधील विध्वंसानंतर आतापर्यंत 25 जणांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. यातील 12 जणांना तपोवन येथून वाचविण्यात आले आहे. तर, 13 जणांना रेणी येथून वाचविण्यात आले आहे.
भारतीय वायुदलाच्या टास्क फोर्सचं सुपर हर्क्युलेस ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट देहरादूनमधील जॉली ग्रँट विमानतळावर दाखल झालंं.
ITBP ने तपोवन बोगद्यात अडकलेल्या 15 लोकांना बाहेर काढले, 250 मीटर लांबीच्या बोगद्यात बचावकार्य सुरु
मदत कार्यात भारतीय सशस्त्र सेना दल सामील झालं आहे. तसेच जोशीमठात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे : संरक्षण मंत्रालय
उत्तराखंडमधील आपत्तीमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू, 150 जण बेपत्ता
उत्तराखंडमधील आपत्तीनंतर चामोली ते हरिद्वारपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगेच्या किनारपट्टी व उपनद्यांच्या किनाऱ्यावरील रस्ते बंद करण्यात आले आहेत. गंगेच्या काठावरील सर्व कॅम्प रिकामी केली जात आहेत. जोशीमठ आणि तपोवनमधील घरे रिकामी केली जात
उत्तराखंडमधील चामोली येथील पूरस्थितीमुळे 100-150 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती, मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी वर्तवली शक्यता
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी उत्तराखंडमधील हिमनग कोसळल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभाग आणि उत्तर प्रदेशमधील अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे निर्देश दिले. गंगा नदीच्या काठावरील सर्व जिल्ह्यातील जिल्हा दंडाधिकारी व पोलिस अधीक्षकांना पूर्णपणे सतर्क राहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
जोशीमठपासून 25 कि.मी. अंतरावर पांग गावात एक प्रचंड हिमनग कोसळला. त्यामुळे धौली नदीला पूर आला. यानंतर हिमस्खलन झाले आणि नदीच्या पुरामुळे ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टचे मोठे नुकसान झाले. काही पूलांचे देखील यामुळे नुकसाना झालं आहे. एनटीपीसीच्या निर्माणाधीन तपोवन जलविद्युत प्रकल्पातील धरणाच्या काही भागाचंही नुकसान झालं आहे. धौली नदीच्या काठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क करण्यात आलं असून तेथून दूर जाण्यास सांगितले जात आहे.
जोशीमठ : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ग्लेशियर (हिमकडा) कोसळल्याची घटना घडली आहे. जोशीमठच्या रेणीतील ऋषीगंगा प्रोजेक्टजवळ ग्लेशियर कोसळल्याची माहिती आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने तपोवनमध्ये वीज प्रकल्प वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे. प्रशासन घटनास्थळी पोहोचलं असून मदत व बचावकार्य सुरू झालं आहे.
तपोवन परिसरातील रेणी गावात वीज प्रकल्पाजवळ अचानक झालेल्या हिमस्खलनानंतर धौलीगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. चामोली जिल्हाधिकाऱ्यांनी धौलीगंगा नदीच्या काठी वसलेल्या गावातील लोकांना बाहेर काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हा दंडाधिकारी व पोलिस अधीक्षक घटनास्थळी रवाना झाले आहेत.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत म्हणाले की, चामोली जिल्ह्यात आपत्तीची घटना समोर आली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना या परिस्थितीला सामोरे जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे दुर्लक्ष करा. सरकार सर्व आवश्यक पावले उचलत आहे.
आयटीबीपीने एक निवेदन जारी केले की, रेणी गावाजवळील धौलीगंगा येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे.पाणी पातळी वाढल्याने अनेक नदीकाठची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. आयटीबीपीचे शेकडो कर्मचारी बचावासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.
चामोली पोलिसांनी सांगितले की, तपोवन परिसरातील हिमकडा तुटल्यामुळे ऋषीगंगा वीज प्रकल्प दुर्घटनाग्रस्त झाला आहे. धौलीगंगा नदीकाठी राहणाऱ्या लोकांना शक्य तितक्या लवकर सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला जातो आहे.