*प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ.वैभवकुमार शिंदे वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रात सहयोगी संचालक*
*आंबा व मसाला पिके यात उल्लेखनीय संशोधन कार्य*
*वेंगुर्ले*
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे १९९१ पासून कार्यरत असलेले डॉ.वैभवकुमार शिंदे यांची प्रादेशिक सहयोगी संचालकपदी वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रात नियुक्ती झाली आहे, संशोधन केंद्राचा व उत्पादन वाढीचा प्रदीर्घ अनुभव असल्याने हाच अनुभव वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्रावर उपयोगात येणार आहे. त्यांनी आंबा व मसाला पिकांमध्ये केलेले उल्लेखनीय कार्य केलं आहे.
झुडूप वर्गीय व काळी मिरी या प्रकारांमध्ये त्यांनी विशेष संशोधन केले आहे. मागील तीन वर्षे त्यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे येथे संचालक प्रशासन व महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळ येथे कार्य केले आहे. कृषी संशोधक म्हणून शेतकरी वर्गात त्यांचे चांगले स्थान असल्याने वेंगुर्ला फळ संशोधन केंद्रात सहयोगी संचालक पदावर त्यांची नियुक्ती झाल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
डॉ. वैभवकुमार शिंदे यांनी कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक (कॅस) अशा विविध पदांवर काम केले असून त्यांना तांत्रिक संशोधन कामाचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे.
त्यांनी कृषी विद्यालय लांजा आंबा संशोधन केंद्र, रामेश्वर ता.देवगड, भात संशोधन केंद्र फोंडा ता.कणकवली, कृषी संशोधन केंद्र रेपोली ता.माणगाव जिल्हा रायगड, मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे, ता.रत्नागिरी येथे सहाय्यक प्राध्यापक ते कार्यालय प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी कृषी संशोधन केंद्र आवाशी व प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे येथे रोपवाटिकेचा कार्यक्रम राबवून केंद्रांचे उत्पन्न कोटींच्या घरात नेले होते. त्यांना आजपर्यंत शेतकरी मित्र शेतीनिष्ठ शेतकरी संशोधनाचे उत्कृष्ट संशोधक, आबासाहेब कुबल व उत्कृष्ट संशोधन सादरीकरण असे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
डॉ.वैभवकुमार शिंदे यांच्या सारख्या अनुभवी आणि संशोधनात जणू काही पीएचडी केलेल्या व्यक्तीची वेंगुर्ला येथील फळ संशोधन केंद्राच्या सहयोगी संशोधक पदावर नियुक्ती होणे ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असून नक्कीच वेंगुर्लाच नव्हे तर जिल्हाभरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
