जिल्ह्यातील उद्योजक व उमेदवारांना नोंदणी करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने मुंबई येथे ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. त्याची नोंदणी कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त, भैयाजी येरमे यांनी केले आहे.
या महारोजगार मेळाव्यामध्ये राज्यातील विविध औद्योगिक आस्थापना व उद्योजक सहभागी होत असल्याने जिल्ह्यातील नोकरीइच्छूक सर्व उमेदवारांनी या संधीचा लाभघेण्यासाठी नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे.
उद्योजकांनी आपल्याकडील उपलब्ध रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर महारोजगार मेळाव्यामध्ये अधिसूचित करावीत. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास उद्योजक तसेच उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांच्याशी त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्याव असे ही, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त श्री. येरमे यांनी कळविले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:- ०२३६२-२२८८३५, ईमेल आयडी:- sindhudurgrojgar@gmail.com संपर्क साधावा.
