You are currently viewing आजऱ्यात ॲम्बुलन्स व ट्रॅक्टरचा भीषण अपघात

आजऱ्यात ॲम्बुलन्स व ट्रॅक्टरचा भीषण अपघात

आजऱ्यात ॲम्बुलन्स व ट्रॅक्टरचा भीषण अपघात –

रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी, दोघांचे प्राण वाचवले

आजरा (ता. आजरा) –

आज सायंकाळी आठ वाजता आजऱ्या रस्त्यावर ॲम्बुलन्स व ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला. ॲम्बुलन्सने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की ॲम्बुलन्समधील दोघे युवक आत अडकून पडले. अपघातात एकाच्या पोटात स्टेअरिंग अडकले होते, तर दुसरा युवक संपूर्णपणे ब्लॉक झाला होता.

या अपघाताच्या वेळी रवी जाधव व लक्ष्मण कदम हे काही कामानिमित्त आजरा येथे आले होते. त्यांनी प्रसंगावधान राखत आणि सामाजिक बांधिलकी जपत तात्काळ लोकांच्या मदतीने त्या दोघांना सुखरूप ॲम्बुलन्समधून बाहेर काढले. नंतर दोघांनाही तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या धाडसी आणि वेळेवर केलेल्या मदत कार्यामुळे दोघांचे प्राण वाचले. रवी जाधव व लक्ष्मण कदम यांच्या या सामाजिक बांधिलकीचे आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा