साटेली तर्फ सातार्डा येथील मायनिंगवर ठाकरे गटाचा दणका;
जिल्हाधिकाऱ्यांकडून उत्खनन व वाहतुकीस तात्काळ बंदी – उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार
सावंतवाडी :
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर साटेली तर्फ सातार्डा येथील लोहखनिज खाणीवरील उत्खनन व वाहतुकीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, बाबुराव धुरी यांच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी ही माहिती देत जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. स्थानिक लोकांच्या आरोग्य व पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची गंभीर दखल घेत, तब्बल ४०.३७ हेक्टर क्षेत्रातील खाण व्यवसायावर कारवाई करण्यात आली आहे.
