*भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले शहरासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण*
*भाजपा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे वेंगुर्ल्यातील जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी रुग्णवाहिका*
वेंगुर्ला :
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय माननीय रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस २० सप्टेंबर २०२५ रोजी होत आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून सातत्याने कार्यरत असणाऱ्या या संघटनानिष्ठ नेतृत्वाच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी उपक्रम व कार्यक्रम करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.
वेंगुर्ले शहरातील जनतेला येणाऱ्या आकस्मिक आरोग्य अस्वास्थ्याच्या अडचणींचा विचार करता जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध देण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने केला होता. भाजप युवा नेते आणि उद्योगपती श्री विशाल परब यांच्या माध्यमातून ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली गेल्याने या संकल्पाची पूर्ती झाली आह . त्याबद्दल मा.नगराध्यक्ष राजन गिरप यांनी श्री विशाल परब यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
श्री बाळू देसाई म्हणाले की भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग पुत्र असल्याचा आम्हा सर्वांनाच अभिमान आहे. वाढदिवस हे निमित्त आहे ज्यातून त्यांच्या सेवाव्रती व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्याचा निर्णय आम्ही सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी घेतला आहे. विविध सेवाभावी उपक्रम आणि कार्यक्रमातून त्यांचा वाढदिवस साजरा केला जाईल. आज श्री विशाल परब यांनी दिलेल्या रुग्णवाहिकेमुळे संकट काळात रुग्णांचे प्राण वाचण्याला मदत होणार आहे. अशा सेवाभावी उपक्रमाचे निश्चितपणे कौतुक असून *शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता वेंगुर्ले भाजपा कार्यालया समोर भाजपा प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण* यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा होणार आहे. सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच जनतेने या सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन मंडल अध्यक्ष श्री विष्णु उर्फ पपु परब व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई यांनी केले आहे.
