*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”देव अय्यप्पा”*
श्री शबरीशा भूतनाथा आम्ही करितो वंदन
स्वामी शरणंम् अय्याप्पा करी विश्व कल्याणIIधृII
देवतांच्या संकटी धावे श्री विष्णू भगवान
विष्णु देवांच्या आज्ञेने केले समुद्रमंथन
मंथन करण्यां मंधर पर्वताने केले योगदानII1II
अमृतकलश आसुरांनी घेतला हिसकावून
सर्वांचे रक्षणार्थ विष्णुने घेतले मोहिनी रूप
मोहमायेने अमृतकलश देवांना केला अर्पणII2II
विष्णूचे मोहक रूपाने शिव झाले आकृष्ट
शिवविष्णूचे मिलनांतून अय्यपा झाले प्रगट
भस्मासुर वध संयुक्त शक्तीतुन जन्मले अय्यप्पनII3II
महिषासुर वध केला ब्रह्मा विष्णू महेशान
संयुक्त रूप दुर्गा चंडिका रूप केले धारण
हरिहर पुत्र अवतरला हाती शस्त्र योगदंडII4II
राजशेखर शिकारीसाठी आले पंपा नदी समीप
तेजस्वी बालक सुवर्णकंठी ल्यालेले झाले दर्शन
ब्राह्मणाने सांगितले बाळास घेऊन जा राज्यातII5II
निपूत्र राजाराणी बाळ येण्याने झाले आनंदीत
तेजस्वी बालकाचे नाव ठेवले मणिकंठन
शस्त्र विद्या विभूषितां मिळाले राज सिंहासनII6II
धर्मशास्ताने दृष्टांचा केला संहार रक्षिले जन
राजाला सांगितले करावे सुंदर मंदिर निर्माण
मणिकंठाने मारला बाण तेथे केले मंदिर स्थापनII7II
मंदिर बांधिले शबरीमाला तपस्विनी आश्रमांत
बांधले गर्भगृह पंचेद्रींय आठ राग तीन गुण
मंदिरे बांधिली मल्लिकापुरत्तमा वावर कडुत्तII8II
देव सिंहासनी विराजमान देत आशीर्वाद
लाखो भक्त येती दर्शनार्थ काळी वस्त्रे लेऊन
नित्य काकड आरती पूजा करिती त्रिकाळII9II
शबरीमाला पर्वत आहे विश्वमान्य तीर्थक्षेत्र
ब्रह्मचर्य व्रत शिरी इरुमुडि घेऊन चढतात
विघ्ननाशक अय्यप्पांचे दर्शने मिळे आनंदII10II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.

