मालवण :
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांची ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांनी सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यपद्धतीची तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध विकासात्मक प्रश्नांबाबत श्रीकृष्ण परब यांनी जिल्हाधिकारीश्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांनीही यावेळी विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.
