You are currently viewing देशाला एक सूत्रतेत बांधणारी भाषा म्हणून हिंदी भाषेचा गौरव करावा लागेल – प्रा.डाॅ.शरद शिरोडकर

देशाला एक सूत्रतेत बांधणारी भाषा म्हणून हिंदी भाषेचा गौरव करावा लागेल – प्रा.डाॅ.शरद शिरोडकर

बांदा :  “सांस्कृतिक विविधता असणा-या भारत देशात भाषेचीही विविधता जरूर आहे .पण हिंदी भाषेने देशाला एकात्मतेचा संदेश देत एका सूत्रात बांधले आहे.” असे प्रतिपादन प्रा.डाॅ. शरद शिरोडकर यांनी गोगटे – वाळके महाविद्यालय बांदा येथील कार्यक्रमात केले.

येथील गोगटे – वाळके महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदी भाषा सप्ताहानिमित्त प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.डाॅ. शिरोडकर बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. गोविंद काजरेकर हे होते.यावेळी हिंदीतील ख्यातनाम साहित्यिक मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. विद्यार्थ्यांनी सुमधूर गायलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी अर्थशास्त्र विभागातील प्रा.डाॅ. मिलन वालावलकर यांच्या “सिंधुदुर्गातील काजू प्रक्रिया उद्योग वास्तव व भवितव्य” या ग्रंथाचे प्रकाशन प्राचार्य डाॅ. गोविंद काजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हिंदी कविता , हिंदी गीत , शेरोशायरी , आदि गद्य–पद साहित्यातून हिंदी भाषेला मानवंदना दिली.यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डाॅ.काजरेकर म्हणाले की , ” प्रेमचंद यांनी प्रगतीशील लेखक संघाची स्थापना करून अनेक नवोदित लेखकांना लिहिण्याचे बळ दिले. हिंदीतील साहित्यातून मानवी जीवनविषयक तत्वज्ञान पाझरत जाते. अनेक विषयांना स्पर्श करणारे हिंदी साहित्य आजच्या काळातही वाचकप्रिय आहे” यावेळी प्राचार्य डाॅ. काजरेकर यांनी प्रा.डाॅ. वालावलकर यांच्या पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखविले. कार्यक्रमाचे आभार डाॅ. एम.एन. वालावलकर यांनी व्यक्त केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ.अनिल शिर्के यांनी केले. या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी वर्ग व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा