You are currently viewing एकादशी निमित्त फोंडाघाट बाजारपेठेत उत्सवाचे चैतन्य;

एकादशी निमित्त फोंडाघाट बाजारपेठेत उत्सवाचे चैतन्य;

एकादशी निमित्त फोंडाघाट बाजारपेठेत उत्सवाचे चैतन्य; मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी, भजन-कीर्तनासह विविध उपक्रम

फोंडाघाट,

आज एकादशीच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट शहरात ‌‌सप्ताहाचा शेवटचा दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असून, संपूर्ण बाजारपेठ चैतन्यमय वातावरणाने न्हालेली आहे. श्री. राधाकृष्ण मंदिर, श्री. मारुती मंदिर आणि श्री. विठ्ठल मंदिर परिसर फुलांच्या आकर्षक सजावटीने सजले असून, दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.

भजन-कीर्तन, डबल बारी, रात्रभर दर्शनाची व्यवस्था अशा विविध कार्यक्रमांनी धार्मिक वातावरण भारले आहे. डाॅ. आपटे यांच्या दवाखान्यासमोर येणाऱ्या भाविकांसाठी मिसळ-पाव वाटपाचे आयोजन बिडये यांच्या मार्फत, तसेच गांधी चौकात रात्रभर चहाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आज रात्री बाळगोपाळ मंडळाची भव्य दिव्य दिंडी काढण्यात येणार असून, भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. या भक्तिमय वातावरणात सामाजिक कार्यकर्ते श्री. अजित नाडकर्णी यांनी सर्व मंदिरांना भेट देऊन यथाशक्ती देणगी अर्पण केली. “श्री. राधाकृष्ण मंदिर, श्री. मारुती मंदिर व श्री. विठ्ठल मंदिर ही आपली शक्ती स्थाने आहेत,” असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.

#श्री. राधे राधे म्हणत शहरात सध्या एक विशिष्ट भक्तिमय ऊर्जा अनुभवायला मिळत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा