You are currently viewing यापुढे जनता कोणाला नाकारेल- स्वीकारेल हे नियतीचं ठरवेल…

यापुढे जनता कोणाला नाकारेल- स्वीकारेल हे नियतीचं ठरवेल…

यापुढे जनता कोणाला नाकारेल- स्वीकारेल हे नियतीचं ठरवेल…

परंतु कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे संजू परब एवढे दिवस कुठे होते – रवी जाधव.

सावंतवाडी

गोरगरीब सफाई कामगारांचा भविष्य निर्वाह निधी बुडवणे हा विषय एक सामाजिक प्रश्न बनला आहे. गोरगरीब साफसफाई कर्मचारी मशीन नसून हा पण एक जनतेचा भाग आहे. आपण एक दिवस त्यांच्या जागेवर उभे राहून ते ज्या पद्धतीने काम करतात ते काम तुम्ही करून दाखवा मग तुम्हाला मानलं. शहरातील जनतेला वेडीस धरणे हे काय जाणून बुजून केलेलं कृत्य नाही येथे त्या गोरगरीब साफसफाई कर्मचाऱ्यांच्या मुलाबाळाच्या शिक्षणाचा व त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे.
गेल्या तीन वर्षापासून ते ह्याच प्रश्नावर लढत आहेत आणि काल त्यांच्या न्याय हक्कासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व विलास जाधव यांनी केलेलं तीव्र आंदोलन पाहून आता काही नेते जागे झालेल आहेत ज्यांनी या अगोदर येथील जनतेला,व्यापाऱ्यांना,कर्मचारी व सफाई कामगारांना जो त्रास दिला आहे तो त्रास येथील जनता कधीच विसरणार नाही त्यामुळे येथील जनतेची काळजी आपण आता करू नये शहरातील जनतेला त्रास होऊ नये याकरिता वेळ पडल्यास सामाजिक संघटनांद्वारे शहरात स्वच्छता मोहीम राबवली जाईल यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान पुढाकार घेईल परंतु आता गोरगरीब साफसफाई कर्मचाऱ्यांना येत्या पंधरा दिवसात न्याय न मिळाल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडल जाणार आहे याची सदर नेत्याने नोंद घ्यावी कारण ज्यांनी त्यांच्या घामाचा- कष्टाचा पैसा खाल्ला आहे त्यांना योग्य शासन झाल्या शिवाय माघार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा