पुणे :
“आपला विश्वास हाच भागीरथी पतसंस्थेचा श्वास” हे ब्रीद वाक्य घेऊन शून्यातून सुरू झालेली हडपसर येथील ही पतसंस्था गेली पंचवीस वर्षे तालुका हवेली कार्यक्षेत्रात मोठ्या विश्वासाने प्रगती करत आहे. संस्थेने लेखापरीक्षण वर्ग “अ” दरवर्षी सातत्याने मिळवलेला आहे. संस्थेची सभासद संख्या यावर्षी १६३२ झाली असून संस्थेकडे ठेवी ६,४४,६२,०९१/- रु, संस्थेची कर्जे ६,४७,३९,३७४/- रु.येणे बाकी आहेत. यामुळे संस्थेला चालू आर्थिक वर्षात ९२,९०,६४१/- रु. उत्पन्न झाले असून नफा ४१,८३,८०३/- रु.झालेला आहे. यावर्षी सभासदांना लाभांश १०% संस्थेचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी डोंबे यांनी घोषित केला असून प्रत्येकाला रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त आकर्षक भेटवस्तू देण्यात आली आहे.
संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी स्वानंद हॉल डीपी रोड हँडबॉल स्टेडियम समोर हडपसर पुणे येथे सभासदांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
सर्वसाधारण सभेसाठी मंचावर पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी डोंबे, उपाध्यक्ष पोपट पाटील, संस्थापकीय संचालक प्रदीपशेठ गोगावले, वामन जाधव, विनोद अष्टुळ, सरोजिनी पाटील, संदीप डोंबाळे, रवींद्र बहिरट, संतोष देशमुख, गोरख शिंदे, गायत्री कामथे, रवींद्र सातकर आणि नवनाथ शेंडकर उपस्थित होते.
यावेळी संस्थापक संचालक विनोद अष्टुळ यांचा सहकार भारती जिल्हाप्रकोष्ठ सहप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल, संचालिका गायत्री कामथे यांना पुणे मनपा.आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच दहावी – बारावी आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल सभासद पाल्यांचे सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले. सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन प्रदीप भापकर यांनी तर उपस्थित कर्मचारी वृंद, सभासद बंधू -भगिनी आणि इतर मान्यवरांचे आभार संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष पोपट पाटील यांनी व्यक्त केले.
