You are currently viewing ओटवणे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सगुण गावंकर यांची फेरनिवड

ओटवणे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सगुण गावंकर यांची फेरनिवड

सावंतवाडी :

ओटवणे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष सगुण गावंकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. आज झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली.

या वेळी सरपंच दाजी गावकर, उपसरपंच संतोष कासरकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. नाईक, कृषी सेवक श्री. स्वप्नील शिर्के, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष रविंद्र म्हापसेकर, संतोष तावडे, गुरु बुराण, प्रभाकर गावकर, संतोष कटाळे, शशी गोसावी यांसह मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सगुण गावंकर यांच्या फेरनिवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा