जिल्ह्यात सर्वत्र राबविणार “पालकमंत्री चषक 2025″भजन स्पर्धा-बुवा संतोष कानडे.
पहिल्या पुष्पाचा शुभारंभ देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मंदिर येथे 23 संप्टेंबर 2025 रोजी.
भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग आणि श्री.देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे आयोजन.
कणकवली/प्रतिनिधी
जिल्ह्यातील भजनी कलावंतांची “भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग” ही संस्था विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे.संस्थाध्यक्ष बुवा श्री.संतोष कानडे यांच्या पुढाकारातून संस्थेतर्फे असंख्य उपक्रम राबविले जातात.जिल्ह्यातील भजनी कलावंतांना उच्च दर्जीय व्यासपीठ प्राप्त व्हावे यासाठी जिल्हास्तरीय “मुख्यमंत्री चषक 2025” ही भजन स्पर्धा मोठ्या दिमाखात कुडाळ येथे संपन्न झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग तथा बंदर विकास मंत्री मा.श्री नितेश राणे यांच्या प्रेरणेतून आणि भजनी कलाकार संस्थेमार्फत आता प्रत्येक तालुक्यामध्ये “पालकमंत्री चषक 2025” भजन स्पर्धा राबविण्यात येणार आहे.या भजन स्पर्धेचा शुभारंभ देवगड तालुक्यातून करण्यात येत असून तालुक्यामध्ये भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग आणि श्री.देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा दक्षिण काशी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेल्या कुणकेश्वर मंदिर येथे राबविण्यात येणार आहे.सदरील भजन स्पर्धेचा 23 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजता शुभारंभ होणार असून नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेचे स्वरूप भव्य दिव्य असे असून प्रथम पारितोषिक 10,023, द्वितीय पारितोषिक 5,023,तृतीय पारितोषिक 3,023 आणि उत्तेजनार्थ एक पारितोषिक 2,023 तसेच वादक,गायक,तबला,कोरस प्रत्येकी रोख रुपये 1,023 असे असणार आहे. प्रथम तीन आणि एक उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त संघांना आकर्षक चषक आणि सर्व सहभागी संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करू,तसेच लागणार सर्व सहकार्य श्री.देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे भजन स्पर्धेसाठी आम्ही करू असे आश्वासन विश्वस्त मंडळ अध्यक्ष श्री.एकनाथ केशव तेली यांनी दिले.
या स्पर्धेचे थेट यू-ट्यूब लाईव्ह प्रक्षेपण असून देवगड तालुक्यातील केबल टीव्ही वर देखील स्पर्धा प्रदर्शित केली जाणार आहे.देवगड तालुक्यातील सर्व भजनी कलाकारांना भजनी कलाकार संस्थेच्या मार्फत व्यासपीठ प्राप्त व्हावं यासाठी या भजन स्पर्धेचे नियोजन करण्यात आले असून तालुक्यातील सर्व कलावंत आणि भजन रसिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष बुवा श्री.संतोष कानडे यांनी केले आहे.
प्रसंगी भजनी कलाकार संस्थेचे सचिव गोपीनाथ लाड,उपाध्यक्ष संदीप नाईकधुरे,संचालक संतोष मिराशी, सहखजिनदार मयूर ठाकूर,ज्येष्ठ बुवा दिपक पाळेकर आणि चंदन गाडी उपस्थित होते.

