You are currently viewing कुडाळ येथे भाजपतर्फे जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा

कुडाळ येथे भाजपतर्फे जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा

सेवा पंधरवड्यानिमित्त २५ सप्टेंबर रोजी स्पर्धा; विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके व सन्मानपत्रे

कुडाळ :

भाजप सिंधुदुर्गच्या वतीने सेवा पंधरवड्यानिमित्त २५ सप्टेंबर रोजी कुडाळ हायस्कूल येथील आरती प्रभू कला अकादमी येथे जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी विषयः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विविध क्षेत्रात मिळविलेले यश, ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत मिळविलेले यश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व व जीवन. प्रथम-दहा हजार रु., द्वितीय सात हजार रु., तृतीय पाच हजार तर उत्तेजनार्थ दोन पारितोषिके प्रत्येकी अडीच हजार रु. अशी आहेत. सहभागी सर्व स्पर्धकांना रोख रक्कम व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. २४ सप्टेंबरला सकाळी १० वाजता रांगोळी काढण्यास सुरुवात होणार आहे. नावनोंदणीसाठी सुनील बांदेकर व रुपेश कानडे, ७०२०३६३८९६ यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत-जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई व कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा