सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार
मुंबई :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे. मात्र यानंतर पुन्हा मुदतवाढ मागू नये असा दंड घालण्यात आला आहे. राज्य सरकारकडून मुदत वाढविण्यात यावी, यासाठी न्यायालयाकडे मागणी करण्यात आली होती. यात सण, परीक्षा आणि अपुरे कर्मचाऱ्यांचे बळ असे कारण पुढे करण्यात आले होते. यावेळी तुम्हाला मुदतवाढ का द्यायची? असा सवाल न्यायालयाने राज्य सरकारला केला होता. मात्र त्यांचेच ३१ जानेवारीपूर्वी ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुढच्या वर्षी निवडणुका होणार हे निश्चित झाले आहे.
तत्पूर्वी सप्टेंबर महिन्यात निवडणुका घेण्यासंदर्भात हालचाली सुरू होत्या. त्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना बदलण्यात आली होती. निवडणुकीची तयारी सुरू झाली होती. परंतु आता मात्र या प्रक्रियेला पूर्णविराम मिळाला असून निवडणुका नवीन वर्षात ३१ जानेवारीपूर्वी होणार हे मात्र निश्चित झाले आहे.

