You are currently viewing आनंद कधीच हरवू द्यायचा नाही

आनंद कधीच हरवू द्यायचा नाही

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*

 

*’आनंद कधीच हरवू द्यायचा नाही’*

*****************

आयुष्य म्हटलं की त्रागातिरपीट, नैराश्य आलंच.एकसुरी आयुष्य कोणाच्याही वाटेला येत नाही अनेक वळण असतात प्रत्येक वळणावर काहीना काही अडथळे येत असतात मग त्यावेळी असं वाटतं की काहीतरी हातून निसटून जातय जणूकाही आनंद हरवल्या सारखं वाटतं.खरचं एखादी काही अकस्मात घटना घडली की आपला मुड लागलीच दुःखात बदलतो.माणूस जेव्हा दुःखात जातो ना तेव्हा खरंच आपल्यातला आनंदही हरवून जातो.हसत खेळत वातावरण क्षणात दुःखात रूपांतरीत होतं आणि हसऱ्या चेहऱ्यावर दुःखाचं जाळ विणलं जातं.आनंदाने भरलेल्या मनात दुःखाचा,वेदनेचा उर दाटून येतो

त्यावेळी कशातच आनंद वाटत नाही.पण काहीही असो सुख दुःख, वेदना,यातना ह्या पाचवीला पुजलेल्या आहे.म्हणून काय तेच धरून आनंदापासून दुर रहायच का? कारण आनंद म्हणजे जगण्याची उर्जा आहे. जितके स्वतःला आनंदीत ठेवाल तितकेच नवचैतन्याच्या लहरी अवतीभोवती फिरत असतात.त्यामुळे जगण्याची उमेद वाढते उत्साह वाढतो‌ आनंदा शिवाय माणसाचं जगणं नाही.आयुष्य कसंही असलं तरी माणसाने हसत खेळत जगावं मस्त जंगाव आनंदाने जगावं आयुष्यात ज्या काही बऱ्यावाईट घटना घडणार आहेत त्या घडतीलच पण आपल्यातला आनंद हरवू द्यायचा नाही.आपण बघतो काहींच तेच रडगाणं असतं त्यांच्या आयुष्यात नवीन काहीच नसतं.तेच आणि तसेच आयुष्य जगायचं त्यात काहीच बदल नसतो अथवा बदल होत ही नाही. अशी बरीच माणसं या जगात आहे.नजरेतून मनाला स्पर्श करणाऱ्या बऱ्याच चांगला गोष्टी बघायला मिळतात.पण अशा आनंदायी प्रसंगाच्या हास्य छटा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नसतात.आहो आनंद निरागस असतो आपल्यात तो सहज येतो.आनंदाचे भाव अगदी हळवे असतात म्हणून त्या भावनांचा गोडवा एखाद्या कळीला खळखळून हसवतो.मग अशा हसऱ्या खळीचा आनंद नाही घेतला तर काय कामाचं ते आयुष्य‌.हसायला काही पैसे मोजावे लागत नाही.आनंदामुळे आयुष्य टवटवीत राहते.एक आनंददायी चेहऱ्यामुळे कितीतरी संदर्भ बदलतात.एखाद्याच्या चेहऱ्यावरची प्रसंन्नता पाहून आपल्यातलाही आनंद उसळतो.खरतर आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण आणि स्पर्धात्मक युगात आनंदात कस रहावं हा प्रश्न अनेकांना पडतो.आनंद हा माणसाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.आपण कितीही संपत्ती,प्रतिष्ठा,ज्ञान मिळवले तरीही मन शांत आनंदी नसेल तर जे काही कमावतो ते सारं काही व्यर्थ आहे. आपल्या जवळ काही जरी नसलं ना तरी चालेल पण जे आहे त्यात समाधानी राहून जो आनंदाने जगतो त्याचासारखा श्रीमंत दुसरा कोणी नाही.म्हणून सतत आनंदी राहण्यासाठी आपण कोण आहोत काय आहोत आपली योग्यता कुठपर्यंत आहे आपले गुणदोष काय आहेत,आपल्या काय आवडतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.स्वत:च्या चुका स्विकारून स्वतःची तुलना इतरांशी न करता आपण जसे आहोत तसेच राहण्यातच खरा आनंद असतो. काहीजण तर उगाचच दुसऱ्याच सुख,वैभव पाहून स्वतःला कमी लेखतात आणि चिंतेच पांघरूण अंगावर ओढून आनंदाला मूकतात. काहीच गरज नाही ना! जे दुसऱ्याकडे आहे ते आपल्याकडे असायलाच हवं असं नाही.जे आपल्या जवळ आहे त्यातच आनंद शोधला तर माणसाच्या आयुष्यात कधीच नैराश्य येतं नाही. पण असं होतं नाही.दुसऱ्याचा आनंद बघून आपला आनंद द्विगुणित झाला पाहिजे दुसऱ्याच्या आनंदात आपण स्वतःहून सहभागी झाल्यास आनंद आनंदीत झाल्याशिवाय राहत नाही. मनात नेहमी नकारात्मक विचार ठेवले तर आयुष्यात आनंद कसा राहिल बरं, एखादी अडचण आली की ‘हे का घडलं?असं विचारण्यापेक्षा यातून मला कसा मार्ग काढता येवू शकेल’ असा विचार केल्यास मार्ग सापडल्याचा आंनद मोजता येत नाही. म्हणून वाईट परिस्थितीतही चांगले पाहण्याचा प्रयत्न करायला हवा.

आनंद शोधता आला पाहिजे. आनंद दिसतोही आणि सापडतो सुध्दा आनंद दिसतो कसा.आपल्या घरातच आनंद असतो पण आपण बघत नाही.आपण काय करतो तर साऱ्या जगाची चिंता आपल्या डोक्यावर घेऊन मिरवतो म्हणून आपल्याला आनंद दिसत नाही‌. प्रत्येकाच्या घरात लहान मुलं असतात मग काय त्यांची मस्ती बघायची त्यांची भांडणे बघायची त्यांचं खेळणं,बोबडे बोलणे बघायचं,लहान मुलं काय बोलतात कसे राहतात हे फक्त बघत रहायच मग बघा आनंद स्वताहून आपला बोट धरून त्या गोंडस मुलांजवळ बसायला लावतो.काय गंमत असते हो लहान‌ मुलांच्या भांडणात किंवा त्यांच्या बोलण्यात. त्यांचे ते आविर्भाव पाहून आपण खळखळून हसायला लागतो.म्हणजे लहान मुलांचे निरपेक्ष,निरागस भाव पाहून कितीतरी आनंदाच्या लहरी आपल्याला मिठी मारतात.सारा थकवा निघून जातो सारी चिंता क्षणात नाहीशी होते आणि त्या आनंदाच्या भरात आपण पुन्हा लहान होतो.आपली जगण्याची उमेद वाढते.म्हणून आनंद बघायचा असेल तर लहान मुलांमधे बघायचा.आनंद सापडतो कसा! पाचशेची नोट सापडल्यावर चेहऱ्यावरचे भाव कसे बदलतात आनंद ओसंडून वाहतो. म्हणजे पैशांन बरोबर आनंदही सांपडतो खरं आहे की नाही.लक्षात घ्या की आनंद आयुष्याची गुरुकिल्ली आहे.आपल्या आयुष्यात जे काही आहे त्याचा मनमुराद आनंद लुटायचा कारण स्वस्थ शरीरातच आनंदी मन नांदतं.शारीरिक आरोग्य आणि मानसिक आनंद यांच अतूट नातं आहे.सतत तक्रारी करणारी, नकारात्मक विचार करणारी,माणसं आपल्यातली ऊर्जा उगाच घालवतात. म्हणून शक्यतो समजूतदार,प्रेमळ आणि सकारात्मक माणसांशी मैत्री करा.अशा लोकांमुळे आपल्याला ऊर्जा,प्रेरणा आणि आनंद मिळतो. मित्रमंडळी,कुटुंब,सहकारी यांच्यासोबत वेळ घालवा कारण आनंद शेअर केल्याने तो द्विगुणित होतो.छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा

खरं पाहता आपल्या अवतीभोवती अशी बरीच माणसं आपण बघत असतो की त्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते.तरी ही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जराही कमी होवू देत नाही.कारण प्रसंन्नता माणसाला बळ देत असते.त्यांना माहीत असतं सकाळी जेवणाची व्यवस्था झाली तेव्हा रात्रही पोटाला भाकर मिळणारच,हाच विश्वास त्या गरीब दुबळ्या कष्टकरी राबणाऱ्या लोकांना चेहऱ्यावर दिसतो म्हणून ते नेहमीच आनंदात राहतात.काहीजरी झालं तरी आपल्यातला आनंद कधीच हरवू द्यायचा नाही.

आपल्याला वाटतं की सुख समृद्धी

ऐश्वर्या श्रीमंती यातच आनंद मिळतो?पण नाही,खरं सुख हे रोजच्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये असतो एखाद्या लहानशा मुलाचं हास्य,झाडावर बसलेला पक्षी,चहा घेता घेता केलेली छानशी गप्पाष्ट मैफिल, कोसळणारा पाऊस,रंग बदलणारे आभाळ, पाखरांची आकाशातील सहल सारेकाही आंनद देणारे प्रसंग आनंद निर्माण करतात.म्हणूनच वर्तमानात जगणं शिकायला हवं.आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्ट करा.जसं की वाचन,लेखन,संगीत,नृत्य,चित्रकला, प्रवास,बागकाम काहीही. छंद हे मन:शांती आणि आनंद देतात.रोज थोडा वेळ अशा गोष्टींसाठी ठेवा ज्या तुम्हाला तुमचं जगणं स्वच्छंदी जगायला मदत होईल.सतत चिंतेत राहून काही होणार आहे का.जे व्हायचं ते होणार असतं आणि निभावतही मग काय कसलाच आंनद घ्ययचा नाही का.सतत चिंतेत राहणं हे आनंदाच्या विरोधात आहे. आयुष्यात काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात,त्यामुळे त्या गोष्टींबाबत चिंता न करता,नियतीवर विश्वास ठेवणं आणि जे आहे त्यात समाधान मानणं हे आपल्या हातात असते “हे सुद्धा निघून जाईल” हा विचार मनात ठेवला, की कोणत्याही वाईट परिस्थितीत मन विचलित होत नाही.कधीतरी दुसऱ्यांना मदत करून बघावी कारण जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करतो तेव्हा आपल्याला खूप मोठा आनंद मिळतो. कोणाचं तरी आयुष्य सुलभ करण्यासाठी केलेली छोटीशी कृती देखील मनात एक समाधान निर्माण करते.सेवा,दान,मदत हे आनंदाचे अचूक मार्ग आहेत.तसेच आनंदी राहण्यासाठी ताणतणावावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.तणावविरहीत आयुष्य व मनाची शांती हाचं आनंदाचा पाया आहे.खर सांगायच तर सतत आनंदीत राहणं म्हणजे स्वतःला कायम प्रसन्न ठेवण.आय आयुष्य हा एक प्रवास आहे आपल्या विचारांमध्ये कृतीत आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल करून मिळवता येणारा एक आनंददायी अनुभव.अर्थात आपल्या हातात असलेल्या गोष्टींसाठी कृतज्ञता चांगली संगत,स्वतःची काळजी आणि दुसऱ्यांना मदत यांमुळे आयुष्य खरंच अधिक आनंददायी होऊ शकतं.आनंद हे बाहेर नसून आपल्यात असतो, फक्त त्याला जागं करण्याची गरज असते ”दु:ख हा जीवनाचा एक भाग आहे. आणि त्याला कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही.पण कितीही दुःख असले तरी त्यातही आनंदात राहण्याच्या प्रयत्न केला तर आनंदाची चांगली मात्रा दु:खावर मात करून सकारात्मकतेने पुढे जाण्यास मदत करू शकते.जीवनात अनेक कारणे असू शकतात ज्याचा सामना करणे कठीण आहे.ज्या व्यक्तीला दैनंदिन जीवनात आनंद मिळू शकतो तो या परिस्थितीवर सहजतेने मात करतो. कस आहे की आनंदात राहण्यासाठी आयुष्यात आपल्याला अनेक संधी मिळत असते. मग त्या संधीच सोनं कसं करून घ्यायचं हे आपल्या हातात असतं.आपणं जर भूतकाळात विचार किंवा भविष्याची चिंता करण्यात कमी वेळ दिला तर वर्तमान क्षणाचा आनंद घेण्यासाठी जास्त वेळ मिळू शकतो कारणं आनंद निर्माण करावा लागतो आपल्या वागण्यातून बोलण्यातून विचारातून कृतीतून आणि भावनेतून

म्हणून आनंद कधीच हरवू द्यायचा नाही.

 

*संजय धनगव्हाळ*

*अर्थात कुसूमाई*

९५७९११३५४७

९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा