आ. निलेश राणे यांचा आकारीपड जमीन व वाळू धोरणासह विविध प्रश्नांवर आवाज; दहा दिवसांत मंत्रालयीन बैठक घेण्याचे आश्वासन
कुडाळ :
आज राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांकडून सर्व विभागांचा विस्तृत आढावा घेण्यात आला. यावेळी वाळू धोरणासहित माणगाव खोऱ्यातील महत्वाचा प्रश्न असलेल्या आकारीपड जमिनीचा प्रश्न आम. निलेश राणे यांनी उपस्थित केला. यावेळी बोलताना आम. निलेश राणे यांनी शासनाने एसओपी जारी करण्याची मागणी करत मंत्रालतयीन पातळीवर विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी केली, त्याला सकारात्मक प्रतिसात देत येत्या दहा दिवसांत ही बैठक लावण्याचे आश्वासन मंत्री योगेश कदम यांनी दिले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या संदर्भातही प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूसे यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या १३० हेक्टरच्या जमिनीबाबत गैरव्यवहार केल्याचा उल्लेख केला. यावेळी ही समिती दुकान झाली आहे, इथे वेळेवर बैठका होत नाहीत, ती त्वरीत बरखास्त करा अशी मागणी केली. सोबतच पंतप्रधान आवस योजनेच्या बाबतीत ग्रामपंचायत प्रशासनाचे अधिकारी गावात पोहोचत नाहीत, शिवाय ग्रामविकासच्या कामांमध्ये अत्यंत धीम्या गतीने काम होत असून आम. निलेश राणे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली, यासोबतच सीएसआरफंड आणण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना आम. निलेश राणे यांनी गटविकास अधिकारी यांना दिल्या.
यावेळी आ.निलेश राणे, आ.दिपक केसरकर, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे, मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे कुडाळ नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर, महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते, आदिंसह महसुल विभाग, राज्य शासन आणि पंचायत समिती विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

