*गुरुवारी प्राधिकरणात वीर गौरव सेनानी सन्मान सोहळा*
पिंपरी
गुरुवार, दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या कालावधीत भारतीय भूतपूर्व सैनिक संघ – पुणे जिल्हा यांच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेत वीर गौरव सेनानी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग. दि. माडगूळकर सभागृह, पेठ क्रमांक २६ निगडी प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात सेवानिवृत्त ब्रिगेडियर इंदरमोहन सिंह, गोपाल वानखेडे, विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे, विधानपरिषद तालिका सभापती अमित गोरखे, भा. ज. पा. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी उपमहापौर राजू मिसाळ आणि शैलजा मोरे यांची प्रमुख उपस्थिती राहील. भारतीय भूतपूर्व सैनिक संघ – पुणे जिल्हा अध्यक्ष यशवंत महाडिक, मानद सचिव दत्तात्रय कुलकर्णी, मानद कोषाध्यक्ष मारुती भराटे हे या सोहळ्याचे निमंत्रक असून ज्येष्ठांचा मानसपुत्र आणि भा. ज. पा. पिंपरी – चिंचवड शहर उपाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे यांनी संयोजक या भूमिकेतून सर्व नागरिकांना या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
