You are currently viewing वाटतय नुकतच सोळाव सरल

वाटतय नुकतच सोळाव सरल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वाटतय नुकतच सोळाव सरल*

 

वाटतय नुकतच सोळाव सरल

*होता दर्शन प्रतिबिंबाचे*

*क्यूट* शब्दाचा अर्थ गवसला

दर्शन होता *रूप गर्वितेचे*

//1//

पायरी चढलो फक्त घराची

थबकून दारात ऊभा राहिलो

घेतला चिमटा *स्व गालाला*

सुखावून मात्र दारी विरघळलो

//2//

वर्णन अप्सरांचे होते वाचले

कशीकाय होणार भेट आपली

नशीब सिकंदर माझे म्हणून

अप्सरेहून सुंदर मैत्रीण भेटली

//3//

नाही *सुचले* काहीच मजला

तरीही हातात लेखणी घेतली

स्फुरू लागल्या काही ओळी

एकेक शब्द माळ ओवून झाली

//4//

अर्पण करतो म्हणून तुजला

असलो जरी मी कोसो *दूर*

हुरहुर लागली अजून मनाला

ऐकवतो तुजला *शब्द सूर*

//5//

 

वि ना य क जोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा