सावंतवाडीत राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ६० प्रकरणे तडजोडीने निकाली…
सावंतवाडी
येथे झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये येथील न्यायालयात एकूण ६० प्रकरणे तडजोडीने निकाली झाली असून १९ लाख ९० हजार ८२० एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे. सावंतवाडी येथील दिवाणी न्यायालयात आयोजित या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या हस्ते जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे आणि सचिव सौ. संपूर्णा गुंडेवारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या लोक अदालतीत एकूण १६८२ प्रकरणे ठेवण्यात आली होती. एकूण ३५८ प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणांपैकी ६० प्रकरणे निकाली निघाली. यातून १९,९०,८२१ रुपयांची वसुली झाली. तर एकूण १३२४ वादपूर्व प्रकरणांपैकी १७९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून ७,१२,४७८ रुपयांची वसुली झाली. तरी प्रलंबित व वादपूर्व दोन्ही मिळून १६८२ प्रकरणे ठेवलेली होतीत. त्यातील एकूण निकाली २३९ प्रकरणे निकाली झालेली असून त्यातील रक्कम रुपये २७ लाख ३ हजार २९९ रक्कमेची वसुली झालेली आहे.
या लोक अदालतीचे कामकाज यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश सौ. जे. एम. मिस्त्री, पॅनल प्रमुख सह दिवाणी न्यायाधीश सौ. आर. जी. कुंभार, आणि पॅनल सदस्य ॲड. अभिषेक आर. चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी सावंतवाडी वकील बारचे अध्यक्ष ॲड. बी. बी. रणशूर, सरकारी सहायक अभियोक्ता गणेश पाटोळे आणि सौ. स्वाती पाटील यांची उपस्थिती होती. लोक अदालत यशस्वी करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र यांसारख्या बँकांनी, तसेच पंचायत समिती, वीज वितरण कंपनी, बीएसएनएल आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. दिवाणी न्यायालय, सावंतवाडी येथील कर्मचारी वर्ग तसेच कार्यालयीन सहाय्यक अधीक्षक सौ. वहिदा मीर आणि इतर कर्मचाऱ्यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले.

