You are currently viewing  ‘भारतरत्न’ ची मोहीम थांबवा! 

 ‘भारतरत्न’ ची मोहीम थांबवा! 

रतन टाटा यांची विनंती

टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू आहे. त्यासाठी मोहीमही चालवली जात आहे. मात्र खुद्द रतन टाटा यांनीच ही मोहीम थांबविण्याची विनंती केली आहे. ‘मी हिंदुस्थानी असणे तसेच हिंदुस्थानच्या विकास आणि सफलतेसाठी माझे योगदान असणे यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो, असेही सांगितले आहे.’

सोशल मीडिया युजर्स अनेकदा रतन टाटा यांच्या चांगल्या कामांची पोस्ट शेअर करताना दिसतात. देश संकटात असताना अनेकदा रतन टाटा मदतीसाठी धावून आले आहेत. देशाच्या विकासात टाटा यांचे योगदान मोलाचे आहे. वक्ते डॉ. विवेक बिंद्रा यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती.

या मागणीनंतर ट्विटरवर #RatanTata आणि #BharatRatnaForRatanTata हा ट्रेंड सुरू झाला. बऱयाच युजर्सनी ही पोस्ट शेअर केली. मात्र रतन टाटा यांनी ही मोहीम थांबविण्याची विनंती केली आहे. ‘मला तुमच्या भावनांचा आदर आहे, मात्र मी तुम्हाला विनंती करतो की ही मोहीम बंद करा’, असे रतन टाटा यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर म्हटले आहे.

मी हिंदुस्थानी असणे… हिंदुस्थानच्या विकास आणि सफलतेसाठी माझे योगदान असणे यासाठी स्वतःला भाग्यशाली समजतो!

प्रतिक्रिया व्यक्त करा