*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कॅमेर्यासोबतचं..माझं जगणं..!!*
भूल पडल्या मनाला
बेभान प्रतिबिंबाचे उधाण
मुरलेल्या नात्यांच्या मुराब्यात
कॅमेराचं जागवतो प्राण..
मऊशार झुल घातली
मातृमुखाने माझ्या जगण्यावर
आजही ..तिचा चेहरा चमकतो
बिलोरी कॅम-याच्या लेन्सवर..
लाखमोलाचे हे देणे ..कॅमेर्याने
जीवेभावे जपत ..मिरवले
तिच्या सोनेरी स्पर्शाने
प्राण …सोनियाचे झाले..
सरणारीवर्ष.. वाढवणारा प्रवास
नात्यातला साचलेपणा जपतो
मनाची श्रीमंती दाखवत..कॅमेराचं
आभासी सीमारेषा ओढतो..
ओल्या आठवणींची दिवेलागण
कॅमेराचं माझा..पेटवतं..राहतो
पैलतटावरची हाक ऐकताचं
कवाडे अल्बमची उघडतो..
बाबा ठाकूर
