You are currently viewing मालवण येथील राजकोट किल्ला दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात

मालवण येथील राजकोट किल्ला दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात

मालवण येथील राजकोट किल्ला दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात

•  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवतालच्या पदपथाच्या दुरुस्तीचे लवकरच पूर्ण होणार

• राजकोट किल्ला संरचनात्मक स्थिरता ( Structure Audit) प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतरच पर्यटकांसाठी होणार खुला

सिंधुदुर्गनगरी 

मालवण तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवतालचा पदपथ  १४ व १५ जून २०२५ रोजी झालेल्या  मुसळधार पावसामुळे खचला होता. त्यानंतर कार्यकारी अभियंतासार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खचलेल्या पदपथाखालील मुरूम पुन्हा भरूनदबाई करून त्यावर सोलिग, PCC, RCC Grade Slab ची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सभोवतालचे जांभ्याचे पदपथही पूर्ववत बसविण्यात आले आहे. यासोबतच चबूतऱ्याचे Granite ची दुरुस्तीजलनिस्सारण व इतर अनुषंगिक दुरुस्तांची कामे अंतिम टप्यात आहेत.  दुरुस्तीची कामे अद्याप सुरू असल्याने राजकोट किल्ला पर्यटकांसाठी सध्यस्थितीत खुला ठेवणे शक्य नाही. त्यामुळे दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर तज्ज्ञांकडून संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र प्राप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात येईल. त्यानंतर राजकोट किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याची परवानगी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडून आदेश प्राप्त होताच सुरु करण्यात येईल अशी माहिती सावंतवाडी सार्वजनि बाधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पूजा इंगवले- देसाई यांनी दिली .

तसेच किल्ला पर्यटकांसाठी सुरु करण्यासंदर्भात पुढील माहिती सावंतवाडी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बाधकाम विभागामार्फत यथावकाश प्रसिद्धिपत्रकाद्वारे योग्यवेळी कळविण्यात येईल असेही श्रीमती इंगवले यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा