दोडामार्ग येथे खुल्या सुगम संगीत व वैयक्तिक नृत्य स्पर्धेचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडणार!
दोडामार्ग
सांस्कृतिक लोककला मंच, दोडामार्ग यांच्या वतीने महाराष्ट्र व गोवा राज्यातील उद्योन्मुख कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी खुली सुगम संगीत गायन स्पर्धा व वैयक्तिक नृत्य स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रविवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता आशीर्वाद मंगल कार्यालय, झरेबांबर, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग येथे पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. श्री. दत्ताराम उर्फ बाबा टोपले (सिनेअभिनेता तथा उद्योजक, भेडशी) हे उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून:
श्री. तुळशीदास नाईक (अध्यक्ष : मिडीया पत्रकार संघ, दोडामार्ग)
श्री. रत्नदिप गवस (अध्यक्ष : दोडामार्ग पत्रकार समिती)
श्री. विष्णू शिवा सुतार (सदस्य : राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन निवड समिती, सिंधुदुर्ग)
यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाला श्री. अनिल शेटकर (सरपंच, गृप ग्रामपंचायत झरेबांबर), श्री. प्रविण नारायण गवस (अध्यक्ष, सरपंच सेवा संघ, सिंधुदुर्ग), श्री. यशवंत (बाबु) सुरेश कुबडे, श्री. प्रविण आनंद देसाई, श्री. सुनिल गवस, श्री. संदेश देसाई, श्री. दयानंद धाऊसकर, श्री. अजित देसाई, श्री. संदीप नाईक, श्री. संजय देसाई, सौ. ज्योती जाधव, श्री. उदय पास्ते, श्री. बाळा धाऊसकर आणि श्री. जयवंत तुळसकर यांची उपस्थिती राहणार आहे.
हा कार्यक्रम स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक लोककला मंच, दोडामार्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे.

